नवी दिल्ली- बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना आता झेड श्रेणीची सीआरपीएफ सुरक्षा मिळणार आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला एक अहवाल सादर केला होता. यामध्ये दलाई लामा यांना धोका असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. दलाई लामा यांना आता एकूण ३३ सुरक्षा कर्मचारी मिळतील, ज्यात १२ कमांडो आणि ६ पीएसओ असतील, जे त्यांना २४ तास सुरक्षा प्रदान करतील. सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये १० सशस्त्र रक्षक असतील जे त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील.
दलाई लामांना झेड श्रेणीची सुरक्षा मिळणार
