मुंबई – दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या मरीन चेंबर्स या इमारतीला आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.या इमारतीच्या शेवटच्या पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग कशी लागली ? यामागील कारण समजलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु असून स्थानिक प्रशासनाने लोकांना अफवांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले.
दक्षिण मुंबईतील मरीन चेंबरला आग
