लिमा – जगातील अव्वल सोने आणि तांब्याचे उत्पादन करणाऱ्या दक्षिण पेरूमधील एका लहान सोन्याच्या खाणीत भीषण स्वरूपाची आग लाग लागल्याचे वृत्त आहे.या आगीत २७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. दोन दशकांहून अधिक काळातील हा देशातील एकमेव प्राणघातक खाण अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक सरकारकडुन जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात सांगण्यात आले की, पेरू देशातील अरेक्विपा या दक्षिणेकडील प्रदेशात शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावरील फोटोंमध्ये साइटमधून धुराचे गडद प्लम्स बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला याची माहिती देण्यात आली.अग्नीशमन दलाकडुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले.तर, जखमी मजुरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गेल्या वर्षीही देशभरात झालेल्या खाण अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर २००२ मध्ये अनेक ठिकाणच्या अशा अपघाती घटनांमध्ये ७३ लोक मृत्युमुखी पडले होते.