पणजी- दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्यातील आमोणे पैगीण येथे रानटी डुक्काराने चक्क कारवर हल्ला केल्याची घटना घडली.या हल्ल्यात तीनजण थोडक्यात बचावले आहेत. मात्र यात गाडीचे नुकसान झाले.
आमोणे येथील सूरज दैयकर हे कार चालवित होते. यावेळी गाडीत त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण खात्याच्या स्थानिक अधिकारी सुगंधा वेळीप आणि एक अंगणवाडी सेविका होती. त्यांची गाडी आमोणे पैगीण येथे आल्यावर अचानक समोरून आलेल्या एका रानटी डुकरांने थेट गाडीवर हल्ला केला. यात गाडीच्या काचा फुटल्या तसेच दरवाजाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यातून तिघेजण थोडक्यात बचावले. इतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने रानटी डुकराने जंगलात धूम ठोकली.