सेऊल –
दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षाचे धोरण प्रमुख यू युई-डोंग यांनी ही घोषणा केली. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावरून जगभरात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. प्राणी हक्क संघटनाही याला विरोध करत आहेत.
अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, देशात दरवर्षी 20 लाख कुत्रे मारले जातात. त्याच वेळी, दरवर्षी सुमारे 1 लाख टन कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. आता हळूहळू कुत्रे खाणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. सरकार 2027 पर्यंत कुत्रा खाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकार यावर्षी विधेयक आणणार आहे.
पॉलिसी चीफ म्हणाले – या कायद्यामुळे जे शेतकरी, कसाई आणि इतर लोकांना व्यवसायात नुकसान होत आहे त्यांना सरकार संपूर्ण मदत करेल. नोंदणीकृत शेतकरी, रेस्टॉरंट कर्मचारी आणि हे मांस विकणाऱ्या इतरांना नुकसान भरपाई दिली जाईल.