सेओल – दक्षिण कोरियात सध्या उष्णतेची तीव्र लाट आली आहे. गेल्या २६ दिवसांपासून येथील रात्रीचे तापमान सातत्याने २५ अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे दक्षिण कोरियाच्या हवामान विभागाने सांगितले.दक्षिण कोरियाच्या हवामान विभागाचे संचालक युन की हन यांनी सांगितले की, गेल्या तब्बल २६ दिवसांपासून दक्षिण कोरियातील रात्रीचे तापमान हे २५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहिले आहे. या तापमानाला ट्रॉपिकल तापमान म्हटले जाते यात रात्रीचे तापमान अधिक असते. या तापमानाने दक्षिण कोरियातील उष्णतेचा ११८ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. या आधी १९०७ साली तापमानात वाढ नोंदवली गेली होती. दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यावरील बुसान शहरात गेल्या २१ दिवसांपासून अधिक तापमान आहे. सेओल शहरातील तापमानही गेल्या २६ दिवसांपासून चढे राहिले आहे.भारतीयांसाठी २५ अंश सेल्सिअस तापमानाला उष्णतेची लाट म्हणणे हास्यास्पद वाटत असले तरी दक्षिण कोरियाच्या तापमानाचा विचार करता हे तापमान अधिक आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावर फिरणारे नागरिक टोप्या व छत्र्यांचा वापर करताहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |