दक्षिण कोरियातील विमान अपघातात ९६ जणांचा मृत्यू

सेओल – दक्षिण कोरियाच्या मुआन इथे आज सकाळी झालेल्या विमानाच्या अपघातात ९६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बँकॉक हून मुआनला येत असलेल्या विमानाला उतरतांना पक्षाची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती विमान कंपनीने दिली आहे.थायलंडच्या बँकॉक मधून दक्षिण कोरियाच्या मुआन कडे येणारे जेजू विमान कंपनीचे हे विमान आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धावपट्टीवर उतरत असतांना हा अपघात झाला. या विमानाला पक्षाची धडक बसल्यानंतर विमानाच्या लँडिंग गेअरमध्ये बिघाड झाला. त्यानंतर या विमानात मोठा स्फोट झाला. या विमानात प्रवासी व कर्मचारी वर्ग मिळून १८१ जण प्रवास करत होते. अपघातग्रस्त विमानातून काही जणांना वाचवण्यात यश आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या अग्निशमन दलाने केला आहे. अपघातात विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. मुआन हे शहर दक्षिण कोरियाची राजधानी सेओलपासून २८८ किलोमीटर वर असून या अपघाताची चौकशी सुरु असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top