बुसान – दक्षिण कोरियातील बुसानच्या गिम्हे इंटरनेशनल एयरपोर्ट आज रात्री साडे दहा वाजता विमानाला अचानक आग लागली . या आगीत ३ प्रवासी जखमी झाले असून १७६ जणांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
कोरियन अधिकार्याने दिलेल्या माहिती नुसार बुसान वरून हॉंगकॉंग कडे निघालेले विमान टेक ऑफ करण्याच्या तयारीत अतानाच अचानक विमानाच्या मागच्या भागात आग लागली त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबरहाट माजली मात्र विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्या अग्निशमन दल आणि बचाव पथक तत्काळ विमानाजवळ पोहचले व त्यांनी विमानातील १६९ प्रवासी आणि ७ करू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले या आगीत ३ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समजते. दक्षिण कोरियात एका महिन्यातील हि दुसरी विमान दुर्घटना आहे. २९ डिसेंबरला मुआन विमानतळावर जेजू एअर लाईन्सचे विमान कोसळून १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आज घडलेल्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत .
दक्षिण कोरियाच्या विमानाला आगतीन प्रवासी जखमी १७६ जणांना वाचवले
