सेऊल – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्यावर मार्शल लॉ लावून बंडखोरी करण्याचा कट रचण्याचा आरोप आहे. याचा दक्षिण कोरिया पोलीस तपास करत असताना आता पोलिसांनी युन सुक येओल यांच्या कार्यालयावर छापा टाकला. या छापेमारीनंतर त्यांना देश सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दक्षिण कोरियाच्या न्याय मंत्रालयाने राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्यावरील बंदीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.न्याय मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू असेपर्यंत त्यांना देश सोडण्याची परवानगी नाही.मंत्रालयाचे म्हणणे आहे की, युन सुक येओलने ३ डिसेंबरच्या रात्री उशिरा मार्शल लॉ लादून देशाला अराजकतेत टाकले होते. विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल, माजी संरक्षण मंत्री किम योंग ह्युंदाई आणि आठ अधिकाऱ्यांविरूध्द पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर बंडाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.