विशाखापट्टणम – तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते अल्लू रमेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अल्लू रमेश यांच्या निधनाच्या बातमीमुळे तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अल्लू रमेशच्या निधनानंतर सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
अल्लू रमेश यांनी नाटकांमधून काम करायला सुरुवात केली होती. अल्लू रमेश यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या होत्या. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चिरुजल्लू चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी टेलू बोम्मलता, मथुरा वाइन, वीधी, ब्लेड, बाबजी और नेपोलियन यांसारख्या चित्रपटातून काम केले. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुकोनी प्रयाणम हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.