थायलंडच्या पंतप्रधान पाइतोंगटार्नंकडे महागड्या २१७ हँडबॅग्ज, ७५ घड्याळे

बँकॉक – थायलंडच्या पंतप्रधान पाइतोंगटार्न शिनावात्रा यांच्या संपत्तीचा खुलासा झाला. पाइतोंगटार्न यांची ४००दशलक्ष डॉलरची संपत्ती आहे. त्यांच्याकडे महागड्या २१७ हँडबॅग्ज आणि ७५ घड्याळे असून हा आकडा थायलंडच्या राष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक आयोगामार्फत उघड झाला आहे.थायलंडमध्ये पंतप्रधान आणि सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या मालमत्तेची माहिती जाहीर करणे अनिवार्य आहेत. त्यामुळे पाइतोंगटार्न यांनी आपल्या मालमत्तेचे तपशील आयोगाला दिले. त्यांच्या संपत्तीतील कपडे आणि घड्याळ्यांचा एक मोठा भाग आहे. ५ दशलक्ष डॉलर्स किमतीची ७५ घड्याळे आणि २ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या २१७ हँडबॅग्ज आहेत. त्यांच्याकडे १६७ कपडे आहेत. त्याची किंमत ७,७७,००० डॉलर आहे. त्या माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या लहान मुलगी असून त्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.आपल्या कुटुंबाच्या राजकीय वारशामुळे त्यांना थायलंडच्या पंतप्रधानपदी स्थान मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top