त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा लवकरच पुरवणार

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा लवकरच पुरवण्यात येणार आहे. दर्शनासाठी लागणाऱ्या भाविकांच्या लांबच लाब रांगा, त्यातून होणारा वेळेचा अपव्यय तसेच वाद टाळण्यासाठी ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, सहधर्मादाय आयुक्तांकडून करण्यात आलेल्या सूचनेनुसार देवस्थान ट्रस्ट तयारीला लागली आहे.

श्रावण महिन्यात त्याचबरोबर विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ भाविकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नियोजन करत आहे. विशेषत: २०० रुपये दर्शनबारीची क्षमता वाढविली जात आहे. दर्शनबारीत अधिक वेळ थांबावे लागल्यास लहान मुले, वयोवृद्धांना बसण्यासाठी सोय करण्याचे काम सुरु आहे. येत्या आठवडाभरात याबाबतची प्रस्तावित कामे पूर्ण होतील, अशी माहिती विश्वस्त कैलास घुले यांनी दिली आहे. दरम्यान, पूर्व दरवाजा धर्मदर्शन रांग आणि २०० रुपये देणगी दर्शनबारी या दोन्हींसाठी येत्या १५ दिवसांत ऑनलाइन बुकिंग सुविधा कार्यान्वित होईल. यासाठी ट्रस्टचे अधिकृत संकेतस्थळाचे काम पूर्ण झाले असून, भाविकांना दर्शनाची वेळ ऑनलाइन पद्धतीने बूक करता येईल. शिवाय मोफत अथवा सशुल्क अशा दोन्ही दर्शनांसाठी ऑनलाइन बुकिंग करून भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top