सवाई माधोपूर – तिरुपती मंदिरातील तुपात जनावरांची चरबी, सिध्दीविनायक मंदिरात प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडले या मालिकेतील आणखी एक प्रकार रणथंभोरच्या सुप्रसिध्द त्रिनेत्र गणेश मंदिर परिसरात उघड झाला आहे. परिसरातील प्रसादाचे लाडू विकणाऱ्या दुकानांमधून बुरशी लागलेले लाडू विकले जात असल्याचे आढळून आले.
याची गांभीर्याने दखल घेत अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने दोनदा धडक कारवाई करीत दुकाने, लाडू तयार करण्यासाठी वापरली जाणारी स्वयंपाकघरे आणि साठवणुकीची गोदामांवर छापे टाकून बुरशी लागलेले लाडू जप्त केले. या प्रकरणी मंदिर परिसरातील १२ दुकाने सील करण्यात आली. या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेले दोन हजार किलो लाडू जप्त करून ते नष्ट करण्यात आले.
त्रिनेत्र गणेश मंदिरात बुरशीयुक्त प्रसादाचे लाडू
