कोल्हापूर- ‘त्रिदेव अजिंक्य’ असा मजकूर असलेले फिल्मी स्टाईलचे बॅनर कोल्हापूर शहरात झळकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचा एकत्रित फोटो असून यशस्वी कारभाराचा दाखला देत ही बॅनरबाजी केली आहे. लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केल्यानंतर आता महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवरच महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ या आठवड्यात कोल्हापूरमधून केला जाणार होता . मात्र तूर्त ही सभा रद्द झाली आहे .
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |