लाहोर: पाकिस्तनाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील तोशाखाना प्रकरणी सुनावणीसाठी लाहोर उच्च न्यायालयाने १२ एप्रिलची तारीख निश्चित केली आहे. न्यायमूर्ती शाहिद बिलाल हसन यांच्या अध्यक्षतेखालील लाहोर उच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करणार आहेत. दोन्ही पक्षांना या प्रकरणात त्यांचे युक्तिवाद सादर करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे. तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे, जिथे राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकाऱ्यांसह काही मान्यवरांना दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. इम्रान खानवर तोशाखान्यात ठेवलेल्या या भेटवस्तू तसेच पंतप्रधान म्हणून मिळालेल्या वस्तू कमी किमतीत खरेदी केल्याचा आणि नंतर नफा कमावण्यासाठी विकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तोशाखाना प्रकरणी इम्रान खानच्यायाचिकेवर १२ एप्रिलला सुनावणी
