अमरावती- तेलंगाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेत्या पलवाई स्रावंती यांनी आज चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रसमिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी तेलंगण भवनात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांचे भव्य स्वागत केले.
पलवाई स्रावंती या काँग्रेसचे दिवंगत नेते पलवाई गोवर्धन रेड्डी यांच्या कन्या आहेत. काँग्रेसने मुनुगोडे मतदारसंघातून त्यांना तिकीट नाकारले होते. तेव्हापासून त्या नाराज होत्या. या मतदारसंघात भाजपमधून पक्षात परतलेल्या राजगोपाळ रेड्डी यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. काल त्यांनी सोमाजीगुडा येथे पत्रकार परिषद घेऊन कॉग्रेसचा राजीमाना दिला असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना उद्देशून चारपानी राजीमाना पत्रात त्यांनी म्हटले होते की, मौन आणि निष्क्रियतेमुळे तेलंगणात पक्षाचे काहीही भले होत नाही. रेवंत रेड्डी यांच्याविरोधात टीका करणाऱ्या राजगोपाल रेड्डी यांना रातोरात परत स्वीकारले गेले आणि त्यांना तिकीट दिले गेले, हे अत्यंत खेदजनक आहे.
तेलंगणात काँग्रेसला धक्का! पलवाई स्रावंती बीआरएसमध्ये
