पणजी- तेलंगणातून गोव्यासाठी एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार आहे. सिकंदराबाद ते वास्को-दा-गामा ट्रेनचा येत्या रविवारी ६ ऑक्टोबर रोजी शुभारंभ होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या ट्रेनसाठी राज्यातील राजकीय नेते आग्रही होते. दक्षिण मध्य रेल्वेने या ट्रेनसाठी हिरवा कंदील दाखवला असून ९ ऑक्टोबरपासून ही ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेत राहणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने सिकंदराबाद- वास्को-दा-गामा-सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सुरू केली आहे. सिकंदराबाद – वास्को-दा-गामा: (ट्रेन क्र. १७०३९) ही बुधवार आणि शुक्रवार अशी ९ ऑक्टोबरपासून नियमित सुरु होणार आहे.तर वास्को-दा-गामा- सिकंदराबाद एक्सप्रेस: (ट्रेन क्रमांक १७०४०) ही गुरुवार आणि शनिवार अशी १० ऑक्टोबरपासून नियमित सुरु होणार आहे.या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी,२ एसी, ३ एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ट्रेनचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तेलंगणातून गोव्यासाठी एक्स्प्रेस ट्रेन धावणार
