तुळजापूर -तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन सशुल्क दर्शन पासची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता या सुविधेला तुळजापूर शहरातील पुजार्यांनी विरोध केला आहे. ही सुविधा रद्द करण्याची मागणी करण्याचे निवेदन पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानला दिले आहे.तुळजाभवानी देवीचे लवकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने आता २२ जुलैपासून भाविकांसाठी ५०० रुपये सशुल्क दर्शन पास ऑनलाइन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर संस्थानने मोबाइल अॅपदेखील तयार केले आहे. या अँपद्वारे मंदिरात येणाऱ्या भाविकांना ५०० रुपये शुल्क देऊन दर्शनासाठी ऑनलाईन पास काढता येणार आहे. मात्र या ऑनलाईन पास सुविधेला पुजाऱ्यांनी विरोध केला आहे. या सुविधेमुळे भाविकांचा पुजाऱ्यांशी संपर्क होणार नाही. भाविकांना पारंपरिक कुलधर्म कुलाचार पूजेला मुकावे लागणार असल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या ऑनलाइन सशुल्क दर्शन पासला पुजार्याचा विरोध
