तुळजापूर – तुळजाभवानी मंदिराची आज पुरातत्त्व विभागाने पुन्हा पाहणी केली आहे. तुळजाभवानी देवी मंदिराचे प्राचीन शिखर चुना आणि जुन्या विटांपासून तयार करण्यात आलेले आहे. अडीच फूट जाडीचे त्यावर नवे सिमेंट काँक्रीटचे व दगडांचे आवरण दिल्यामुळे वजन वाढले आहे. परिणामी दोन दगडी शिळांना तडे गेले आहेत.
हे तडे गेल्यानंतर खासगी कंपनीने स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल तयार केला. मंदिराच्या पुजारी मंडळाने अहवालावर आक्षेप घेतला आहे. पुजारी मंडळाने याबाबत छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन तक्रार केली होती. छत्रपती संभाजीराजे सूचनेनंतर पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस खर्गे यांनी आज तुळजाभवानी मंदिराची पुन्हा पाहणी केली.
या पाहणीनंतर तेजस खर्गे म्हणाले की, तुळजाभवानी मंदिराचे खासगी कंपनीने मुख्य गाभारा आणि शिखराची पुनर्बांधणीचा अहवाल तयार केला आहे. आम्ही तो स्वीकारणार नाही. पुरातत्त्व विभाग स्वतंत्र अहवाल तयार करेल.
तुळजाभवानी मंदिराची पुरातत्त्व विभागाकडून पुन्हा पाहणी
