धाराशिव – तुळजाभवानी मंदिरात भाविक श्रद्धेपोटी सुवर्ण अलंकार,महावस्त्र, प्रतिमा अर्पण करत असतात. ठाण्यातील एका भाविकाने श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्धा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. मंदिर संस्थान तर्फे या कुटुंबाचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरीव नक्षीकाम असलेल्या या मुकुटाची सध्या तुळजापुरात मोठी चर्चा रंगली आहे.
तुळजाभवानी चरणी अर्धा किलो सोन्याचा मुकुट
