अंकारा
तुर्कस्थानमध्ये उद्या (२७ मे) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदानाची दुसरी फेरी होणार आहे. २० वर्षांपासून सत्तेत असलेले अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन पहिल्या फेरीत ४९.५२% मतांसह आघाडीवर होते. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पहिल्या फेरीत राष्ट्राध्यक्षपदाच्या तीन उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला ५०% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत.
२० वर्षांपासून सत्तेत असलेले अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांना मतदानाच्या पहिल्या फेरीत ४९.५२% मतांसह आघाडीवर होते. एर्दोगन विजयापासून अवघी काही मते दूर आहेत. सहा विरोधी पक्षांच्या युतीचे नेते चर्चित केमाल किलिदारेग्लू ४४.८८% सह दुसऱ्या क्रमांकावर होते. त्याच वेळी, एर्दोगनसारखेच कट्टरपंथी व अध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार सिनान ओगान ५.२% मतांसह तिसऱ्या स्थानावर होते. एर्दाेगन यांनी मास्टर स्ट्रोक मारत ओगान यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आता अंतिम लढतीत ओगान यांची कट्टरपंथी मते रेसेप तय्यप एर्दाेगन यांच्याकडे येतील. दरम्यान, तुर्कस्तानचा राष्ट्राध्यक्ष कुणीही असला तरी राष्ट्रवादाचा विजय झाला असेल मत निवडणूक विश्लेषकांनी व्यक्त केले.