अंकारा- तुर्कीच्या बालिकेसर येथील एका स्फोटकाच्या कारखान्यात झालेल्या शक्तीशाली स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेबदद्ल तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.तुर्कीच्या बालिकेसर येथील कारेसी जिल्हयातील कारखान्यात आज सकाळी हा स्फोट झाला. कारखान्यात स्फोटकांची निर्मिती होत असतानाच काही तांत्रिक बिघाडामुळे अचानक हा स्फोट झाला. यावेळी १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील चार जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
तुर्कीत स्फोटकाच्या कारखान्यात स्फोट
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-24-at-5.55.15-PM.jpg)