वसई – अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या वसई येथील भजनलाल स्टुडिओला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्टुडिओला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी आगीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे इथल्या कंपन्या आणि स्टुडिओमध्ये काम करणार्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या स्टुडिओला आग
