तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत
७ एप्रिल पासून बदल

सावंतवाडी – कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल होणार आहेत. या बदलाला कोकण रेल्वेने मंजुरी दिली आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक कोकण रेल्वे बोर्डाकडून जारी करण्यात आले. सध्या ही गाडी सावंतवाडी रोड म्हणजेच मळगाव स्थानकातून सायंकाळी ७: १० या वेळेत मार्गस्थ होते. या वेळेत ७ एप्रिल पासून बदल होत असून ती रात्री ८ वाजता सावंतवाडी येथून निघणार आहे. तुतारी एक्स्प्रेस ही रेल्वे कोकणातील सावंतवाडी स्थानकातून सुटते. या आधीही अनेकदा या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाले आहेत. ही गाडी मुंबईच्या दादर स्थानकात शेवटचा थांबा घेते.

Scroll to Top