देहू – संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे (३०) यांनी आज सकाळी देहू येथील त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली. शिरीष महाराज मोरे हे प्रसिद्ध व्याख्याते, तसेच शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. शिरीष महाराजांचा विवाह २० फेब्रुवारीला होणार होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात कर्जाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आत्महत्येचे कारण कर्जाशी संबंधित असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
तुकाराम महाराजांच्या वंशजाची आत्महत्या
