पुणे- ठाकरे गटाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापलिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे आणि पल्लवी जावळे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे माजी नगरसेवक ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशाल धनकवडे,बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ठाकरे गटानेही पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
तीन माजी नगरसेवकांची ठाकरे गटातून हकालपट्टी
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/UDHAV-1024x576.jpg)