तिरुपती –
जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरण्यावरून वाद झाल्यानंतर आज मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. श्रीवरी (श्री वेंकटेश्वर) मंदिरातील बंगारू बावी (सुवर्ण विहीर) यागशाळेत (विधिस्थळ) हा होम आयोजित करण्यात आला.सकाळी ६ वाजता सुरू झालेला होम हवनाचा विधी १० वाजेपर्यंत चालला. या हवनाचा उद्देश मंदिराला शुद्ध करून भगवान व्यंकटेश्वर स्वामींना प्रसन्न करणे हा असल्याचा सांगण्यात आले. या पंचगव्य परीक्षा (शुद्धीकरण) होमात मंदिर बोर्डाचे अधिकारी सहभागी झाले होते.