Home / News / तिरुपती इस्कॉन मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

तिरुपती इस्कॉन मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

तामीळनाडू – गेल्या दोन आठवड्यांत सातत्याने विमान कंपन्यांना विमाने बॉम्बने उडण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता तामीळनाडू तील तिरूपती इस्कॉन मंदिराला...

By: E-Paper Navakal

तामीळनाडू – गेल्या दोन आठवड्यांत सातत्याने विमान कंपन्यांना विमाने बॉम्बने उडण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता तामीळनाडू तील तिरूपती इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. काल ईमेलद्वारे धमकी मिळाल्याचे सांगत याबाबत मंदिर प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ईमेलमध्ये आयएसआयएसचे दहशतवादी मंदिर उडवून देणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. धमकीचा ईमेल आल्याची माहिती मिळताच तिरुपती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंदिराची झडती घेतली. स्फोटकांचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, मंदिर परिसरातून कोणतीही स्फोटके किंवा आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही.

Web Title:
संबंधित बातम्या