हैदराबाद- देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानने व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून लाडू घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे. देवस्थानचे ट्रस्टचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी वेंकैया चौधरी यांनी ही माहिती दिली.वेंकैया चौधरी म्हणाले की,काही दलाल मंडळी हे प्रसादाचे लाडू चढ्या भावाने भाविकांना विकत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.याला आळा घालण्यासाठीच आधारकार्ड अनिवार्य केले आहे.प्रसादाच्या लाडू विक्रीसाठी विशेष काउंटर बनवण्यात आले आहे. काउंटर नंबर ४८ आणि ६२ वर हे लाडू मिळतील.दर्शनासाठी टोकन किंवा तिकीट असणारे भक्त पाहिल्याप्रमाणे एक मोफत लाडू मिळाल्यानंतर देखील अजून लाडू विकत घेऊ शकतात.मात्र ज्या भक्तांच्याजवळ दर्शन तिकीट आणि टोकन नाही,त्यांनी लाडूचा प्रसाद घेण्यासाठी आधारकार्ड दाखवणे आवश्यक राहील.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |