Home / News / तिरुपतीच्या प्रसादमध्ये अळ्या आढळल्याचा भक्ताचा दावा

तिरुपतीच्या प्रसादमध्ये अळ्या आढळल्याचा भक्ताचा दावा

तिरुपती -तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरल्याबाबतचा वाद अद्याप संपलेला नसताना एका भक्ताने महाप्रसादात अळ्या सापडल्याचा दावा...

By: E-Paper Navakal

तिरुपती -तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरल्याबाबतचा वाद अद्याप संपलेला नसताना एका भक्ताने महाप्रसादात अळ्या सापडल्याचा दावा केला. मात्र, मंदिराच्या प्रशासनाने हा आरोप फेटाळला.चंदू या भक्ताने असा दावा केला की, मी वारंगलहून तिरुपती मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. दुपारी मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येणार्या दहीभातात अळ्या होते. ही बाब मी मंदिरातील कर्मचाऱ्याला सांगितली, तेव्हा तो म्हणाला की,’असे कधी कधी होते.’ एवढे बोलून मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी चंदू यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या घटनेबाबत सरकारने चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंदू यांनी केली आहे.यापूर्वी याच मंदिरातील प्रसाद लाडू करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल आढळल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाने केला होता.

Web Title:
संबंधित बातम्या