चेन्नई- तामिळनाडूच्या कावराईपेट्टईजवळ काल रात्री म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस आणि मालगाडी अपघातात झाला होता. या अपघातस्थळाला आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली.
बिहारच्या दरभंगा येथे काल रात्री साडेआठच्या सुमारास बागमती एक्स्प्रेसने पाठीमागून मालगाडीला धडक दिली. एक्सप्रेसचे डब्बे रूळावरून घसरले. या भीषण अपघातात १९ प्रवासी जखमी झाले होते. सर्व जखमी प्रवाशांना रूग्णालयात भरती करण्यात आले. यातील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. दक्षिण रेल्वेकडून या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकार्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.