तामिळनाडूत भाविकाने बांधले परग्रहवासी देवाचे मंदिर

सालेम – सृष्टीचा निर्माता, जगन्नियंता अशा परमेश्वराची विविध रुपातील मंदिरे सर्वत्र आढळतात. या सर्व देवता पृथ्वीशी संबंधित आहेत. तामिळनाडूमध्ये मात्र एका भाविकाने चक्क परग्रहवासी देवाचे मंदिर बांधले आहे. या मंदिरासाठी परग्रहावरील लोकांकडून रितसर परवानगी घेतल्याचा दावाही त्याने केला आहे.तमिळनाडूतील सालेम जिल्ह्याच्या मट्टामुपट्टी गावात लोगानाथन उर्फ सिध्धर भकिया नावाच्या भक्ताने हे परग्रहवासी देवाचे मंदिर बांधले आहे. पावणेतीन एकर जागेवर त्याने हे मंदिर बांधले असून त्यासाठी परग्रहाची परवानगी घेतली आहे. असे ते म्हणतात. या देवाची मूर्ती तळघरात ठेवण्यात आलेली असून सिध्धर त्याची दररोज पूजा करतात. मंदिराबद्दल त्यांनी सांगितले की, परग्रहवासी जीवांची निर्मिती पहिल्यांदा भगवान शंकराने केली. त्यांच्याकडे कोणत्याही संकटात मार्ग काढण्याची शक्ती आहे. हे परग्रहवासी महिला व पुरुष रुपात असतात व मानवतेला मदत करतात. मी त्यांच्या बरोबर बोललो आहे. त्यांना पाहिले आहे. ते केवळ चांगेल काम करण्यासाठी आहेत. लोकांनीही त्यांचे अस्तित्व मान्य केले पाहिजे. त्यांच्या प्रती श्रद्धा ठेवली पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top