Home / News / तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांना जामीन

तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांना जामीन

नवी दिल्ली- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुझल सेंट्रल जेलमध्ये असलेले तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा...

By: Team Navakal

नवी दिल्ली- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुझल सेंट्रल जेलमध्ये असलेले तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. खटल्याला विलंब होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने बालाजी यांचा जामीन अर्ज मंजूर केला. १४ जून २०२३ मध्ये सेंथिल बालाजी यांना ईडीने अटक केली होती.

२०१४ मध्ये तामिळनाडू सरकारमध्ये परिवहन मंत्री असताना बालाजी यांच्यावर महानगर परिवहन महामंडळात लोकांना पैसे घेऊन नोकऱ्या दिल्याचा आरोप होता. बालाजी यांनी मनी लाँड्रिंग केल्याचाही आरोप आहे. त्यांना अटक झाल्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर १७ जुलै रोजी रुग्णालयातून सोडल्यानंतर बालाजी यांची तामिळनाडूतील पुझल सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. अटकेच्या ८ महिन्यांनंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता.

Web Title:
संबंधित बातम्या