धुळे- शिंदखेडा तालुक्याच्या सोनेवाडी गावातील तापी नदीत बुडून बहिण आणि भावाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. उत्कर्ष पाटील आणि वैष्णवी पाटील असे मृत बहिण आणि भावाचे नावे आहेत.
सर्वपित्री अमावस्यानिमित्त सोनेवाडी गावाजवळच असलेल्या तापी नदीत दोघे भाऊ बहिणी बेल पत्र टाकण्यासाठी गेले होते. या नदीपात्राजवळ उत्कर्षचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी वैष्णवी नदीत उतरली. मात्र, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. त्यांच्या काकांनी देखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीत पाणी जास्त असल्याने त्या दोघांना वाचवण्यात अपयश आले. नदीतून बाहेर काढल्यानंतर दोघांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून बहिण भावांना मृत घोषित केले.
तापी नदीमध्ये बुडून बहिण-भावाचा मृत्यू
