ताज महालमध्ये दोघा तरुणांनी कबरीवर गंगाजल अर्पण केले

नवी दिल्ली : आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये आज सकाळी हिंदू महासभेशी संबंधित दोन तरुणांनी कबरीवर गंगाजल अर्पण केले. त्यांनी कबरीवर ओम लिहिलेले स्टिकर चिकटवले. तरुणांना या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. ताजमहाल ही कबर नसून हिंदुंचा तेजोमहाल आहे असा हिंदू महासभेचा दावा आहे .सुरक्षा दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन ताजगंज पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोन्ही तरुण हिंदू महासभेशी संबंधित असल्याचे बोलले जाते. या तरुणांनी चित्रित केलेल्या व्हिडीओमध्ये दिसले की दोघेही तरुण कबरी जवळ पोहचल्यानंतर त्यातील एकाने पाण्याच्या बाटलीमधून कबरीवर गंगाजल अर्पण केले. यासोबतच कबरीवर ओम लिहिलेले स्टिकर चिकटवले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिंदू महासभा आग्रा जिल्हा अध्यक्ष मीना राठौर ताजमहालमध्ये आल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना पश्चिमेकडील गेटवर अडवले. त्यांना आत प्रवेश दिला नव्हता. यावेळी त्या चार तास गेट बाहेर उभ्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top