मुंबई – दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रो-३ प्रकल्पातील गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज ही गाडी सुमारे अर्धा तास खोळंबली.ही गाडी सहार मेट्रो स्थानकात थांबून राहिल्याने या मार्गावरील मेट्रोसेवा विस्कळीत झाली.कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी) ते आरे दुग्ध वसाहत (आरे कॉलनी) हा भुयारी मेट्रो मार्ग सोमवारपासून सुरू करण्यात आला.आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सहार स्थानकात अडकून पडली. त्यामुळे झटपट कार्यालयात पोहोचण्यासाठी मेट्रोची निवड करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला.
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो-३ खोळंबली
