तब्बल ४ फुट लांबीचा फणस केवळ २०० रुपयांत विकला

भोपाळ- मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील एका बाजारात चक्क ४ फूट लांब फणस विक्रीसाठी आला होता.मात्र या फणसाचा आकार इतका मोठा होता की,त्याला कुणी खरेदीदारही मिळेना.अखेर या शेतकर्‍याने हा भला मोठा फणस केवळ दोनशे रुपयांना विकून तो घरी निघून गेला.

कटनी जिल्ह्यातील बरही बसस्टँडवर हा शेतकरी फणसाने भरलेली अनेक पोती विक्रीसाठी घेऊन आला होता. त्यात एक चार फूट लांबीचा फणस होता. तीन-चार जणांनी कसबसा हा फणस गाडीतून उतरवून बाजारात नेला . त्याचे अधिक वजन आणि आकार पाहून लोकांना आश्चर्य वाटले; पण हा फणस खरेदी करायला कुणीच तयार नव्हते. अनेक तास असेच गेल्यावर शेवटी या वृद्ध शेतकर्‍याला नाइलाजाने हा फणस केवळ दोनशे रुपयांत विकावा लागला. एका स्थानिक दुकानदार महिलेने हा फणस खरेदी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top