नवी दिल्ली- गणेश विसर्जनावेळी ढोल ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादक नसावे, या हरित लवादाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोलताशाचा जोरदार आवाज घुमणार आहे.
गेल्या ३० ऑगस्टला हरित लवादाने वादकाच्या संख्येसंदर्भात आदेश दिला होता. या आदेशाविरोधातील याचिकेच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले की, गणेश विसर्जनाची मिरवणूक फक्त एकाच दिवशी असते. ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली एक दिवसापुरते ढोल ताशा पथकावर निर्बंध आणणे चुकीचे आहे. वादकाच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे हरित लवादाच्या आदेशाला स्थगिती देत आहोत.