ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यातील बनपुरी परिसरात बिबट्याने दोन दिवसांमध्ये चार शेळ्यांना ठार केले. तसेच या परिसरात बिबट्यांची तीन पिल्ले आढळल्याने दहशत पसरली आहे.
बनपुरी येथील शेतकरी अनिल कृष्णराव पाटील यांच्या जनावरांच्या शेडमध्ये रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून त्यांच्या तीन शेळ्या ठार केल्या. दोन दिवसांत हा बिबट्याचा हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळ्यांच्या मृत्यूचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या अधिका-याला, बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा जनावरासह वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ढेबेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ४ शेळ्या ठार
