ढाका – बांगलादेशची राजधानी ढाका येथे शनिवारी पहाटे एका शॉपिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत हजारो दुकाने जळून खाक झाली. न्यूमार्केट पोलीस स्टेशनचे प्रमुख शफीकुल गनी साबू यांनी सांगितले की, न्यूमार्केट आणि ढाका कॉलेज दरम्यान असलेल्या न्यू सुपरमार्केट या शॉपिंग सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर पहाटे 4:45 वाजता आग लागली
आग विझवण्यासाठी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सची टीम घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या 28 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन सेवेचे सहाय्यक उपसंचालक शाहजहान सिकदार यांनी सांगितले की, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गॅस सिलिंडरचा स्फोट, खराब वातावरण आणि सदोष विद्युत वायरिंगमुळे इमारतींना आग लागणे आणि स्फोट होणे या घटना बांगलादेशमध्ये वारंवार घडत आहेत. गेल्या महिन्यात ढाका येथील एका बाजारपेठेत झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला होता.
ढाक्यातील शॉपिंग सेंटरला आग
