डोळ्यासमोर मृत्यू पाहिला पण सुदैवाने मी वाचलो!

बुलढाणा- विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमधील सर्वात शेटवच्या सीटवरुन प्रवास करणाऱ्या आयुषने बस दुर्घटनेबद्दल माहिती देताना आपला जीव कसा वाचला ते सांगितले.
आयुष आणि त्याच्या मित्रांनी पुण्याला फिरायला जायचा प्लॅन केला होता. त्यासाठी, बुटी बोरीवरुन सर्व मित्र सोबतच निघणार होते. मात्र, ऐनवेळी प्लॅन चेंज झाला आणि आयुष एकटाच बुट्टी बोरीवरुन निघाला. आयुषचे मित्र वणीवरुन दुसऱ्या ट्रॅव्हल बसमधून येत होते. बसमध्ये झोपेत असताना आयुषच्या अंगावर काहीतरी पडल्याचे त्याला जाणवले. त्यामुळे, तो जागा झाला. त्यावेळी, आयुषच्या अंगावर २-३ जण पडले होते. बसमध्ये आग लागली होती आणि तेव्हा आयुषला अपघात झाल्याची जाणीव झाली. तो शेवटच्या सीटवर असल्याने शेजारील काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले. आयुष्यने आणखी दोघांना बसमधून बाहेर काढले. यांनतर अगदी दोन मिनटांनी बसमध्ये स्फोट झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top