डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरिस ४ सप्टेंबरला वाद विवाद रंगणार

वॉशिंग्टन – अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये पुढच्या महिन्यात सार्वजनिक डिबेट रंगणार आहे. ४ सप्टेंबर रोजी त्यांच्यात एबीसी वाहिनीवर ही चर्चा होणार आहे. ट्रम्प यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात तीन टीव्ही वाहिन्यांवरुन वादविवादाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.याबाबत बोलतांना ट्रम्प म्हणाले की, ४, १० व २५ सप्टेंबर या तीन दिवशी अनुक्रमे फॉक्स, एबीसी व एनबीसी वाहिन्यांवर वादविवाद दिसणार आहेत. वादविवादांची जागा, उपस्थित लोकांची यादी यावर चर्चा सुरु असून कमला हॅरिस यांच्याही संमतीची वाट पाहात आहे. सध्या जग महायुद्धाच्या जवळ आले असून कमला ही परिस्थिती हाताळू शकेल असे वाटत नाही. कमला यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होण्यासाठी आवश्यक मतेही मिळाली नाहीत आणि आता त्या निवडणूक लढवत आहेत. त्या एक कमकुवत उमेदवार असून सध्या पत्रकारांनाही मुलाखती देत नाहीत. दरम्यान या संदर्भात कमला हॅरिस म्हणाल्या की, ट्रम्प यांनी वादविवादांत सहभागी होण्याला संमती दिल्याचा मला आनंद झाला. मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मला आशा आहे की ट्रम्प चर्चेसाठी येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top