वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा इराणकडे वळवला. इराणचे सर्वोच्च नेते आयोत्तोल्ला अली खामेनी यांना इराणकडून अण्वस्त्रांची निर्मिती केली जात असल्याच्या अनुषंगाने मी हे पत्र पाठवले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की,”इराणने अण्वस्त्रांच्या साठ्यासंदर्भात चर्चा करायला हवी. कारण यासंदर्भात अमेरिकेने लष्करी कारवाई केली, तर ते फार भयानक होईल. मी इराणशी वाटाघाटी करणार आहोत. मात्र यावर सर्वजण राजी होतील का नाही, हे सांगता येणार नाही. मात्र सर्वजण राजी झाले तर एखादे युद्ध जिंकावे इतके हे चांगले असेल.” मात्र त्यांच्या या पत्राच्या दाव्याला खामेनी यांच्याकडून त्वरित दुजोरा मिळू शकला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणकडे वळवला मोर्चा
