न्यूयॉर्क- अमेरिकेत पुन्हा सत्तेवर येताच ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक निर्णयांचा सपाटा लावला. त्यात परदेशी नागरिकांच्या स्थलांतरा पासून अतिरिक्त आयात कर लावण्या बाबतच्या निर्णयांचा समावेश आहे. पण त्याचे आता उलट परिणामही दिसायला लागलेत. अमेरिकेने चीनच्या सर्व उत्पादनावर आयात कर लावताच चीननेही पलटवार केला आहे. चीनही अमेरिकेच्या काही वस्तूंवर आयात कर लावणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने चीनी वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करताच काही तासातच चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर करवाढ करण्याचा निर्णय घेतला . या पूर्वी ८०० डॉलर्स पेक्षा कमी किमतीच्या चीनी मालावर कोणताही कर नव्हता त्यामुळे चीनी इ कॉमर्स कंपन्या आपल्या अमेरिकन ग्राहकांशी थेट व्यवहार करीत होत्या . मात्र या व्यापारी धोरणावर अमेरिकेत टीका होत होती . त्यामुळे ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी चीन मधून येणाऱ्या सर्वच मालावर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतला त्यामुळे चीन आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील दुरावा आणखी वाढणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे जशास तसे उत्तर
