डोनाल्ड ट्रम्प तुरुंगात जाणार? १० जानेवारीला खटल्याचा निकाल

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये जाण्याऐवजी तुरुंगात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाचखोरी प्रकरणी येत्या १० जानेवारी रोजी त्यांना शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका पोर्न स्टारला लाच दिल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. या खटल्यातील निकाल येत्या १० जानेवारीला सुनावला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला दोषी ठरवले जाण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्यावरील शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. यावेळी न्यायमूर्ती एम मर्चन हे निकाल देणार आहेत. ट्रम्प यांनी याआधी आपल्यावरील खटला रद्द करण्याची मागणी केली होती. ती न्यायमूर्ती मर्चन यांनी फेटाळली होती. त्यामुळे १० जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प हे पदावर असले किंवा ते पद धारण करणार असले तरी त्याचा आपल्यावर काहीही दबाव नसल्याचे न्यायमूर्तींनी आधीच स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top