वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे माजी पत्रकार कुश देसाई यांची त्यांचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली. व्हाईट हाऊसने याबाबत आज घोषणा केली. कुश देसाई यांनी यापूर्वी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनसाठी उपसंचार संचालक आणि आयोवा रिपब्लिकन पक्षाचे संप्रेषण संचालक म्हणून काम केले होते. रिपब्लिकन नॅशनल कमिटीमध्ये ते डेप्युटी बॅटलग्राउंड स्टेट्स आणि पेनसिल्व्हेनिया कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून काम केले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मूळ भारतीय वंशाच्या तिघांची प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली. ट्रम्प प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दक्षिण आणि मध्य आशियाशी संबंधित वरिष्ठ संचालक म्हणून रिकी गिल यांना जबाबदारी दिली आहे. तर सौरभ शर्मा यांची राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक कार्यालयात नियुक्ती केली. त्यांच्याकडे येथील कर्मचारी भरती आणि नियुक्त्यांची जबाबदारी दिली आहे.