मुंबई : जे. जे. रुग्णालयातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. डॉ. लहाने यांच्या जागी आता नवीन अधिकार्याची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याच्या आरोपानंतर डॉ. लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते. या प्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. आता सरकारने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे. राजीनामा मंजूर केल्याबद्दल तात्याराव लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सरकारचे आभार मानले.