डॅनियल मुखे ऑस्ट्रेलियाचे
पहिले भारतीय कोषाधिकारी

कॅनबेरा – भारतीय वंशाचे डॅनियल मुखे हे ऑस्ट्रेलियातील राज्याचे कोषाधिकारी बनणारे पहिले राजकारणी ठरले. त्यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्याच्या कोषाधिकारी पदाची शपथ घेतली. त्यांनी गीतेवर हात ठेऊन निष्ठेची शपथ घेतली. डॅनियल यांनी न्यू साउथ वेल्स (एनएसडब्लू) प्रीमियर ख्रिस मिन आणि इतर सहा मंत्र्यांसह शपथ घेतली.

२०१५ मध्ये, स्टीव्ह वॉनच्या जागी, न्यू साउथ वेल्सच्या वरच्या सभागृहात लेबर पार्टीने डॅनियल्स मुखे यांची निवड केली. डॅनियल्स हे न्यू साउथ वेल्समधील भारतीय पार्श्वभूमीचे पहिले नेते आहेत. तसेच भगवत गीतेवर हात ठेऊन निष्ठेची शपथ घेणारे ते ऑस्ट्रेलियातील पहिले व्यक्ती आहेत. या पुर्वी २०१९ मध्ये त्यांना वित्त आणि लघु व्यवसायाचे शॅडो मंत्री आणि गिग अर्थव्यवस्थेचे शॅडो मंत्री बनवण्यात आले होते. डॅनियल्स यांनी पदभार स्विकारल्यानंतर दिलेल्या निवेदनात \’न्यू साउथ वेल्स या महान राज्याचे कोषाधिकारी म्हणून मी शपथ घेतली. हा सन्मान आणि विशेषाधिकार सोपवल्याबद्दल एनएसडब्ल्यूच्या नागरिकांचे आभार मानतो,\’ असे म्हटले. \’भगवतगीतेवर निष्ठेची शपथ घेणारा मी पहिला ऑस्ट्रेलियन मंत्री आहे. हे केवळ शक्य आहे कारण ऑस्ट्रेलिया हा एक मुक्त विचारांचा देश आहे.\’ असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Scroll to Top