Home / News / डिसेंबरमध्ये कोकण रेल्वेत जनरल श्रेणीचे डबे वाढवणार

डिसेंबरमध्ये कोकण रेल्वेत जनरल श्रेणीचे डबे वाढवणार

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार आहे.या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार आहे.या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत बदल करताना रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वातानुकूलित व स्लीपर श्रेणीच्या डब्यांची संख्या कमी करून जनरल श्रेणीचे डबे वाढविले आहेत.

लांब पल्ल्यांच्या २२ ते २४ डब्यांच्या या गाड्यांना आता किमान दोन जनरल डब्यांच्या जागी चार जनरल डबे केले आहेत.यामुळे आरक्षण न मिळालेल्या आणि आयत्या वेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तिरुवनंतपूरम-वेरावल एक्स्प्रेस गाडीमध्ये हा बदल करण्यात आला आहे. यामध्ये एका थ्री टायर एसी इकॉनॉमी डब्यांचे जनरल डब्यांत रूपांतर करण्यात आले आहे.१९ डिसेंबरपासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.त्याचप्रमाणे कोच्युवेली – श्रीगंगानगर एक्स्प्रेसला ३ जनरल डबे होते.या गाडीच्या एका थ्री टायर एसी डब्याचे रूपांतर जनरल डब्यात करण्यात आले असून हा बदल ७ डिसेंबरपासून होणार आहे. तसेच तिरुवनंतपूरम-हजरत निजामुद्दिन एक्स्प्रेसला आता दोन ऐवजी चार जनरल डबे असणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या