डहाणू- पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांवर ऐन पावसाळ्यात मोठे संकट कोसळले आहे.तालुक्यातील मुख्य पीक समजल्या जाणार्या चिकू या फळावर ‘सीड बोअरर’ म्हणजेच बी पोखरणार्या अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे या अळीच्या पाखरांना कसे जाळ्यात पकडायचे याचे संशोधन आतापर्यंत झालेले नाही.
त्यामुळे ऑगस्ट- सप्टेंबरमधील फळांचा हंगाम वाया जातोय की काय,अशी भीती बागायतदार व्यक्त करत आहेत.
डहाणू तालुक्यातील बोर्डी गावात चिकूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मात्र मागील सातआठ वर्षांपासुन या पिकावर पावसाळ्यातच या बी पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे.या अळीवर म्हणजेच बुरशीवर कुठली औषधे उपयुक्त ठरत आहेत व त्याचा वापर कधी करायचा याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन होत नसल्याने चिकू उत्पादक हवालदिल झाला आहे.त्यामुळे सीडलेस चिकूची जात जर शोधण्यात यश आले तर ‘सीड बोअरर’ अळीचा प्रश्नच उद्भवणार नसल्याचे चिकू उत्पादकांचे म्हणणे आहे.